Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

Share Market Dictionary Marathi (शेयर बाजार शब्दकोश)

#शब्दकोश #sharemarket

१) CMP :- Current Market Price म्हणजे सध्या असलेली shares ची price. ती दर सेकंदाला बदलत असते जर कोणी बोलाल कि CMP १२० ला buy करा…. म्हणजे तो share रु १२० च्या आसपास विकत घ्यायचा असतो.

२) Sale Target :– भविष्यात shares विकण्यासाठी भाकीत केलेली price . जर कोणी बोलाल कि त्याच target १४० आहे ..म्हणजे तो share भविष्यात रु १४० विकता येईल ..

३) Holding Period :- म्हणजे Buy आणी Sell मधल्या वेळेला Holding Period म्हणतात. जस ,तुम्ही हे बराचवेळा ऐकल असेलं की ‘CMP १२० BUY and its TARGET is १४० and hold for 1 month.’म्हणजे काय होतो अर्थ कि ,रु १२० विकत घ्या रु १४० ला विकू शकतात आणि रु १४० होण्यासाठी तुम्हाला कमीतकमी 1 महिना थांबव लागेल .

४) Stop Loss :- म्हणजे काय तर बराच वेळा लोक shares त्याच दिवशी विकत घेतात आणि विकतात त्याला Intraday म्हणतात. अश्यावेळेस जर तुम्ही एक share १२० घेतला असेलं आणि तुम्हाला तो त्याच दिवशी १२५ विकायचा असेलं ( अस तुम्ही भाकीत केल) पण तो काही कारणाने रु १२५ होण्येवजी रु ११५ गेला तर तुमचा loss रु ५ होईल …अश्यावेळेस तुमच्या इच्छेनुसार तुम्ही STOPLOSS ह्या दिलेल्या रिकाम्या जागेत रु ११८ अशी price टाकून ठेवावी म्हणजे तुमचा होणारा loss हा फक्त रु २ होतो .

५) Intraday :– बराच वेळा लोक shares त्याच दिवशी विकत घेतात आणि विकतात त्याला Intraday म्हणतात. म्हणजे सकाळी ११ वाजता एक शेर रु १२० ला १०० घेतले म्हणजे रु १२,००० चे आणि दुपारी २-३ वाजता रु १२३ ला विकले ..ह्याला Intraday trading म्हणतात.

६) Delivery :- Shares एकदा घेऊन ते त्या दिवशी न विकता बरेच दिवस किंवा बरेच वर्ष होल्ड करणे म्हणजे delivery घेणे म्हणतात.

७) Short Selling :– ह्यामध्ये उलट करतात आधी स्वतः कडे नसलेले shares sell करतात आणि नंतर ( उद्या किंवा आजच ) buy करतात.( हो shares मार्केट मध्ये नसलेले shares पण विकता येतात )
एक उदाहरण घेऊ या ,आपण इन्फोसिस शेअर जे काही कारणास्तव उद्या पडणार आहे अशी भाकीत केल ,मग आपण सध्याचा बाजारभाव (CMP) मध्ये इन्फोसिस चे १०० shares विक्री केले RS १००० ला .समजा. शेअर किंमत अपेक्षेप्रमाणे उद्या पुरेशा प्रमाणात खाली आली RS ९००ह्या दराने खरेदी केली . विक्री आणि खरेदी दर RS १०० फरक हा आपाला नफा आहे. तसाच, जर price Rs ११०० झाली तर RS १०० तोटा पण होऊ शकतो ….. जर भाकीत नीट करता येत नसेल तर असली रिस्की trading न केलेली बरी…

८) BULL आणी BEAR MARKETS म्हणजे काय ?
स्टॉक दर वरच्या दिशेने जाणारा असेल, तर ते एक वळू( BULL) बाजार मानली जाते; आणी price चा कल खाली असेल तर, तो एक अस्वल ( बेअर/bear) बाजार मानली जाते.

९) Dividend काय आहे ?
shares हा company चा हिस्सा भाग आहे .त्याचे एक किंवा अनेक भाग आपण विकत घेत असतो company चे ,म्हणजेच आपणा पण त्या company चे त्या प्रमाणात मालक असतो ..जर company ला profit झाल्यास company ला सगळ्या shares holder ला नफा वाटावा लागतो त्यालाच dividend म्हणतात. तो वर्षातून एकदा किंवा २ दा देतात कायमस्वरूपी investor ला. (जे एक वर्षा मध्ये स्टॉक विक्री करत नाही असे ) – हे दीर्घकालीन investor/भागधारकांना उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे.

Comment मध्ये तुम्ही आणखी काही शब्दांचे अर्थ आणि आपले प्रश्न विचारू शकता… धन्यवाद !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *